अंतराळातील विचित्र असे बहीग्रह

केप्लर-४५२B

नाव.                  :- केप्लर-४५२B (KEPLER-452B)

जवळील तारा     :- केप्लर-४५२ (KEPLER-452)

शोधाची तारीख   :- २३ जुलै २०१५

शोधणारी संस्था  :- केप्लर सायन्स टीम

पृथ्वीपासून अंतर :-१४०२ प्रकाश वर्ष 

      केप्लर-४५२B या ग्रहाचे आकारमान पृथ्वीच्या तुलनेपेक्षा ६०% जास्त आहे. भौतिकशास्त्रज्ञांनी या ग्रहाला पृथ्वी २.० म्हटले आहे. हा ग्रह आकारमानाने पृथ्वीपेक्षा मोठा असला तरी त्याला स्वतःच्या ताऱ्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यास ३८५ दिवस लागतात. केप्लर-४५२B हा ग्रह स्वतःच्या ताऱ्यापासून ५% जास्त लांब आहे (सूर्य-पृथ्वीच्या तुलनेत).


वास्प-१२B


नाव.                  :- वास्प-१२B (WASP-12B)

जवळील तारा     :- वास्प-१२ (WASP-12)

शोधाची तारीख   :- १ एप्रिल २००८

शोधणारी संस्था  :- कॅमेरॉन Et. Al. (Super WASP)

पृथ्वीपासून अंतर :- ८७०.८ प्रकाश वर्ष

वास्प-१२B हा ग्रह आत्तापर्यंत शोधलेला सर्वात उष्ण तापमान असलेला ग्रह आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान २२५०°C येवढे आहे. कारण हा ग्रह स्वतःच्या ताऱ्यापासून ३४,०३,७६३ किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे. या ग्रहाला स्वतःच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास एक दिवस लागतो.


J१४०७B

नाव.                  :- J१४०७B

जवळील तारा     :- J१४०७ (V १४०० Centauri)

शोधाची तारीख   :- २०१२

शोधणारी संस्था  :- इरिक मामाजेक (Erik Mamajek)

पृथ्वीपासून अंतर :-४३३.८ प्रकाश वर्ष

               या ग्रहाची रचना डोळ्यांना भ्रमित पाडणारी आहे असे भौतिकशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा ग्रह स्वतःच्या ताऱ्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यास जवळजवळ १० वर्षे लावतो. जश्या शनी ग्रहाला कड्या आहेत त्याचप्रमाणे या ग्रहाला कड्या आहेत पण विशेष म्हणजे या कड्यांचा व्यास हा १२० दशलक्ष किलोमीटर एवढा आहे. हा ग्रह केवळ  १६ दशलक्ष जुना आहे.


टिप्पणी करे