Stranger things in outer Space

मैग्नेटर (Magnetar)

Image Source – Google | Image by – wikimedia

मैग्नेटर हे एका प्रकारचे न्यूट्रोन तारा असून त्याच्याजवळ अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. मैग्नेटरमधील हे उच्च ऊर्जा विद्युचुंबकीय किरणांचा शक्ती कमजोर करते. (क्ष-किरण आणि गामा किरण)..

१९९२ साली रॉबर्ट डंकन आणि क्रिस्थोफर थॉम्पसन यांनी मैग्नेटरचा सिद्धांत प्रस्थापित केला. १ जुलै २०२० या दिवशी भौतिकशास्त्रज्ञांनी एक अहवाल सादर केला.

“जेव्हा (FRBs) या उपकरणाच्या तरंगा संकुचित केल्या तेव्हा त्यांना एकाच वेळी संशिप्त अवकाशिय वस्तूंचे विलिनीकरण आणि सामान्य केंद्रातील अतीदिप्त नवतारा संकुचित होऊन मैग्नेटर उद्भवताणा दिसले.”

बाकीच्या न्यूट्रोन ताऱ्या प्रमाणे मैग्नेटरचा व्यास २० किलोमीटर आणि त्याचे वस्तुमान हे आपल्या सूर्यापेक्षा १ ते २ पट जास्त असते. मैग्नेटरच्या एका चमच्या एवढ्या अंतर्गत भागाची घनता ही १०० दशलक्ष टन एवढी असेल.

आतापर्यंत शोधण्यात यश मिळालेले काही मैग्नेटर

  1. SGR ०५२५-६६ >>> १६३,००० प्रकाश वर्ष
  2. SGR १८०६-२० >>> ५०,००० प्रकाश वर्ष
  3. SGR १९००+२४ >>> २०,००० प्रकाश वर्ष
  4. SGR ०५०१+४५१६ >>> १५,००० प्रकाश वर्ष
  5. १E १०४८.१-५९३७ >>> ९,००० प्रकाश वर्ष

नेबुला (Nebula)

नेबुला ही अवकाशातील ताऱ्या दरम्यानच्या जागेत असते. याला अंतराळ जागा असे म्हणतात. नेबुला ही संपणाऱ्या ताऱ्याच्या विस्फोटातून उत्पन्न होणाऱ्या धुली आणि वायुंपासून बनते. यात हायड्रोजन आणि हेलियम या वायूंचे प्रमाण जास्त असते.

नेबुलातील धूळ आणि वायु हे कालांतराने पसरतात. पण काही काळानंतर तेथील गुरुत्वाकर्षण हे धूळ आणि वायुला एकत्र करण्यास सुरुवात करते. जसजशी धूळ आणि वायु एकत्र येते.

गुरुत्वाकर्षण हेही वाढत जाते. एकत्र आलेले धूळ आणि वायु हे अतिशय मोठे होऊन ते त्यांच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षनाने कोसळतात. ते कोसळतात कारण त्यांच्या केंद्र स्थानी असलेल्या घटकांपासून बनलेले ढग हे अतिशय गरम होतात आणि हा गरम केंद्र नव्या ताऱ्याच्या उत्पतीचा पहिला टप्पा असतो.

गरुड नेबुला (Eagle Nebula)

Image Source – Google | Image by – wikipedia

हे स्तंभ अवकाशातील धूळ आणि वायु यांच्या साहाय्याने बनले आहे. यांची रचना एखाद्या गुरुडवाणी वाटते. या स्तंभांना गरुड नेबुलातील निर्मितीचे आधार स्तंभ असे नाव पडले आहे. कारण ते सक्रिय ताऱ्यांच्या निर्मितीचे क्षेत्र आहे.

करीना नेबुला (Carina Nebula)

Image Source – Google | Image by – wikimedia

या छायाचितरांमध्ये गुलाबी रंगाच्या भागात तुम्हाला पिवळे आणि पांढरे ठिपके आहेत हे छोटे ठिपके नवीन तारे आहेत.

हेलिक्स नेबुला (Helix Nebula)

Image Source – Google | Image by – wikipedia

हे छायाचित्र जरा भितीदायक डोळ्याचे दिसते पण ती एक नेबुला आहे. नासाच्या स्पित्झर अवकाश दुरदर्षकातून हे छायाचित्र काढलेले आहे. ही नेबुला कुंभ नक्षत्रामध्ये स्थित आहे. पृथ्वीपासून याचे अंतर सुमारे ७०० प्रकाश वर्ष इतके आहे.

Thank you for reading my “Stranger things in outer Space” on “Super Space Station” Site.